भूपेंद्र पटेल सरकारचा आज शपथविधी! सर्व नव्या चेहऱ्यांना संधी?

भूपेंद्र पटेल सरकारचा आज शपथविधी! सर्व नव्या चेहऱ्यांना संधी?

भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील गुजरात सरकारचा शपथविधी सोहळा आज गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी पार पडत आहे. गांधीनगर येथील राजभवनात दुपारी एक वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सध्या या शपथविधी सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली असून गुजरात मध्ये सर्वच्या सर्व नवीन चेहरे मंत्रिपदी दिसणार असल्याच्या बातम्या येताना दिसत आहेत.

सोमवार, १३ सप्टेंबर रोजी भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करणे हे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी खेळी होती. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेलेल्या पटेल यांच्या गळ्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ घालताना आपल्या जुन्या धक्कातंत्राची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना करून दिली. कडवा पटेल समाजाचे असणारे भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातही हेच धक्कातंत्र पुन्हा बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

भारतीय जवान गाजवणार रशिया! शांघाय सहकार्य संघटनेचा संयुक्त युद्धाभ्यास

 

निवृत्त नौदल सैनिकांना फ्लिपकार्ट मार्फत पुनर्रोजगाराची संधी

…म्हणून एअर इंडिया विकत घेणे टाटांसाठी आहे खास

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी पार पडणार असल्याचे सांगितले जाते. या शपथविधी सोहळ्यात २० पेक्षा अधिक मंत्री हे मंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. यावेळी विजय रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज आणि मोठ्या नावांचा पत्ता कट होणार असल्याचे मानले जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाले दिलेल्या बातम्यांनुसार गुजरातमध्ये सर्वच्या सर्व नवे चेहरे मंत्रिमंडळात पाहायला मिळतील. तसे झाले तर गुजरात निवडणूकीच्या तोंडावर भाजपाने केलेली ही मोठी राजकीय खेळी ठरेल.

Exit mobile version