२०१८ ला भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २१ फेब्रुवारी रोजी म्हणजेच काल चौकशी आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावली होती.
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शरद पवार यांना २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स भीमा-कोरेगाव आयोगाने पाठवले होते. मात्र २२ आणि २३ रोजी उपस्थित राहता येणार नाही, असे पवारांनी आयोगाला सांगितले होते म्हणून, एक दिवस आधी त्यांनी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर ते पुन्हा आयोगासमोर हजर होतील असेही त्यांनी सांगितले आहे.
आयोगाने अंदाजे एक तास पवार यांची चौकशी केली आहे. त्या तासाभरात पवारांनी त्यांचे म्हणणे सांगितले आहे. चौकशी दरम्यान काय झाले याचा तपशील अजून आलेला नाही. शरद पवार यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यामुळे हिंसाचार भडकली असल्याचे म्हटले होते.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या जातीय हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने निवृत्त न्यायाधीश जेएन पटेल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगावच्या चौकशी आयोगाची स्थापना केली होती. हा आयोग तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवणार आहे.
हे ही वाचा:
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….
‘समीर वानखेडे बार परवाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी घाई कशाला?’
‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’
जेव्हा भीमा कोरेगाव प्रकरण झाले तेव्हा शरद पवार यांनी त्यांचे मत मांडले होते. ते म्हणाले होते,” भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराआधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथले वातावरण बिघडवले होते. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे.” या वक्तव्यामुळे शरद पवार यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती.