भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, जखमी पण थोडक्यात बचावले

अज्ञात हल्लेखोरांनी गाडीतून येत चंद्रशेखर आझाद यांना लक्ष्य केले

भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, जखमी पण थोडक्यात बचावले

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेख आझाद तथा रावण यांच्यावर बुधवारी उत्तराखंड येथील सहारणपूर येथे गोळीबार झाला. त्यात ते बचावले असले तरी गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेली. गोळीबार करणाऱ्यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या.

चंद्रशेखर आझाद हे आपल्या टोयोटा फॉर्च्युनर या गाडीतून प्रवास करत होते. त्यांच्या गाडीत इतरही चार जण होते. त्याचवेळी मारुती स्वीफ्ट डिझायर या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हल्लेखोर आले. त्या गाडीवर हरयाणाचा नंबर होता. त्यांनी मागून आझाद यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. पण आझाद यांना त्यातील एक गोळी केवळ चाटून गेली. त्यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

सहारणपूर येथील देवबंद हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. आझाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली की, आपण या हल्लेखोरांना पाहिले नाही पण गाडीत बसलेल्यांनी त्यांना पाहिले असावे. आझाद हे दिल्लीला निघालेले असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. आपल्या एका पाठीराख्याच्या तेराव्याला ते गेले होते. या घटनेनंतर लगेचच समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात जंगलराज सुरू असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना कोणतीही जरब राहिलेली नाही. जंगलराज सुरू आहे. या गुन्हेगारांना जे राजकीय संरक्षण मिळत आहे, ते गंभीर आहे.

हे ही वाचा:

‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!

गुरुदक्षिणा देण्याच्या मूडमध्ये मोदी

भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक

मुंबईला पावसाने झोडपले; पाणी तुंबण्याच्या घटना, झाड पडून २ मृत्यू

 

समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव म्हणाले की, राज्यातील विरोधक हे आता सरकार आणि गुन्हेगार या दोघांचेही लक्ष्य बनले आहेत. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्यामुळे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

Exit mobile version