शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स पाठवले होते. समन्सनुसार त्यांना आज (२४ नोव्हेंबर) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आज भावना गवळी यांच्या वकिलाने भावना गवळी यांना ईडीकडून समन्स मिळालेच नसल्याचे सांगितले. समन्स न मिळाल्यामुळे भावना गवळी चौकशीसाठी राहिल्या नाहीत असे वकिलाकडून सांगण्यात आल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.
भावना गवळी यांना ईडीने यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. दुसऱ्या समन्सनुसार भावना गवळी यांना ४ ऑक्टोबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तेव्हा तब्येतीचे कारण देत भावना गवळी या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. तसेच त्यांनी त्यांनी ईडीकडे चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. आता ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतरही भावना गवळी चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे यापुढे ईडीकडून कोणती कारवाई करण्यात येणार याकडे लक्ष असणार आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकार मांडणार क्रिप्टोकरन्सीचे विधेयक
निलेश साबळे म्हणाले, राणे साहेब पुन्हा अशी चूक होणार नाही!
उपराष्ट्रपतींचे निवासस्थान कुठे असावे हे पण सामान्य माणसाला विचारायचे की काय?
मुंबई विमानतळावर जप्त केले २० कोटींचे ड्रग्ज
गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर खासदार गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ईडीने छापेमारी केली होती. तसेच महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला अटक करण्यात आली होती.