ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामीनदाराचं शिंदे गटात

भाऊ चौधरी यांच्याकडे अनेक महत्वाची पदे आणि जबाबदाऱ्या होत्या.

ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामीनदाराचं शिंदे गटात

ठाकरे गटाचे शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच भाऊ चौधरी आणि त्यांचे निकटवर्तीय सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाऊ चौधरी यांच्यासह त्यांचे निकटवर्तीयांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. भाऊ चौधरी संजय राऊतांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाऊ चौधरी यांनीच संजय राऊत यांच्या जामीनावर स्वाक्षरी केली होती. ठाकरे गटामध्ये भाऊ चौधरी यांच्याकडे अनेक महत्वाची पदे आणि जबाबदाऱ्या होत्या.

शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर भाऊ चौधरी म्हणाले, शिवसेनेत गेली ३२ वर्षं मी काम करतोय. शिवसेनेचा गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि डोंबिवलीचा शहर प्रमुख म्हणून काम करत असताना पक्षाने जी मला जबाबदारी दिली, ती मी प्रामाणिकपणे पूर्ण केली. मात्र, गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदनं दिली. पण त्यातलं एकही काम मार्गी लागलं नाही, असं चौधरी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

अपमान करून घेण्याची हौस…

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

वर्ल्डकप जिंकूनही अर्जेंटिना नंबर वन नाहीच!

आफताबनंतर आता रियाझ…हिंदू तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला नदीत

दरम्यान, काही दिवसांपूर्वीचं ठाकरे गटातील ११ माजी नगरसेवकांसह मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता.या मध्ये आता भाऊ चौधरींनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा संजय राऊतांना आणि ठाकरे गटालाही धक्का मानला जातो आहे.

Exit mobile version