झुंबड गोळा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई कधी?

झुंबड गोळा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई कधी?

मेट्रोच्या ट्रायल रनच्या उद्घाटनासाठी आलेले मुख्यमंत्री रस्त्यावरील रहदारीमुळे धास्तावले. पण हायवेवर तुंबलेल्या ट्रॅफिकबाबत नाराजी व्यक्त करणारे मुख्यमंत्री स्वतः मेट्रोच्या ट्रायल रनच्या उद्घाटनासाठी झुंबड गोळा करतात, त्यांच्यावर कारवाई कोण करणार? असा रोखठोक सवाल भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे. गर्दी जमविली म्हणून मुख्यमंत्र्यांवर कारवाई कधी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आकुर्ली येथे मेट्रो चाचणीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुंबईतील वाढलेल्या रहदारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय, अशीच गर्दी वाढत असेल तर कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल, असे विधानही केले. त्यावर भातखळकर यांनी ट्विट करून स्वतः मुख्यमंत्री गर्दी करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली.

हे ही वाचा:
जूनमध्ये मिळणार १२ कोटी लसमात्रा

मेट्रोचा बट्याबोळ करूनही मुख्यमंत्र्यांकडून ट्रायल रनची नौटंकी

फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

दोन दिवसांत ठरणार सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परिक्षांचे भवितव्य

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात फारसे दौऱ्यावर नसतात. निसर्ग वादळातील किंवा आताच्या तौक्ते वादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी धावता दौरा केला होता. आता ते मेट्रोच्या चाचणीसाठी गेले आणि रहदारी बघून धास्तावले. या मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन करण्यासाठी गेलेले असताना भाषणात त्यांनी ही भीती व्यक्त केली. मुंबईतील रहदारी पाहून मला धक्काच बसला. मी रात्री केलेल्या भाषणात लॉकडाऊन उठवल्याचे तर बोललो नाही ना, असेच मनात आले. जर हे कायम राहिले तर कठोर निर्बंध घालावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version