लोकसत्ता दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. शिवजयंतीला न उपस्थित राहिलेले उद्धव ठाकरे लोकसत्तेच्या कार्यक्रमाला कसे काय दिसले, असे आश्चर्य अनेकांनी व्यक्त केेले. यावेळी भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मुख्यमंत्रीपदाऐवजी पक्षप्रमुख बोलत असल्याचेच वाटत आहे.
आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की कुठल्या टोळीचे आहेत? काय भाषा आहे. शिवजयंतीला घराबाहेर पले नाहीत. तेव्हाही मी म्हटले की, शिवनेरीला ते प्रकृतीच्या कारणास्तव जाऊ शकले नाहीत. पण ते गेटवे ऑफ इंडियाला, शिवाजी पार्कला जाऊन तिथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करू शकले असते. पण शिवजयंतीला ते अनुपस्थित राहिले आणि लोकसत्तेच्या कार्यक्रमाला मात्र मुख्यमंत्री टुणटुणीत होऊन येतात, हा काय प्रकार आहे.
हे ही वाचा:
एल्फिन्स्टनचा उड्डाणपूलमराठी माणूस होणार का गुल?
देश, राज्य झालं, आता पालिकाही भाजपाला हवी; मग आम्ही काय धुणीभांडी करायची?
कमाल आहे! तालिबान सरकार म्हणते युद्ध नको, शांतता राखा
९३ एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आत्महत्या; सरकारला चिंता नाही
भातखळकर म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायची यांची लायकी आहे का, असे उद्धव ठाकरे विचारतात, ते कुणाला विचारतात. तिथे केंद्रात एक व्यक्ती बसलेले नाहीत. केंद्र सरकार तिथे आहे ,त्यांचे काही नियम आहेत. मुख्यमंत्री हे खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. त्यांचे वैशिष्ट्य हे की ते पक्षप्रमुखांच्याच भूमिकेत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, प्रशासनाचे मुख्यमंत्री या नात्याने ते बोलायलाच तयार नाहीत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता कुठल्या गोष्टींची राज्य सरकारने पूर्तता केली यावर त्यांनी बोलले पाहिजे. केंद्र जर देत नाही असे वाटत असेल तर स्वतःची आमदारकी निवडणूक लावण्यासाठी जसा पंतप्रधानांना फोन केला तसे त्यांना करता आले असते. मुख्यमंत्री वारंवार त्यांची काय योग्यता आहे, हे बाष्कळ आणि चुकीच्या विधानाने दाखवून देतात.