पावसाळ्यात पुन्हा मुंबई तुंबणार, पण निकम्म्या सत्ताधाऱ्यांना त्याचे काय?

पावसाळ्यात पुन्हा मुंबई तुंबणार, पण निकम्म्या सत्ताधाऱ्यांना त्याचे काय?

अतुल भातखळकरांची ठाकरे सरकारवर टीका

पावसाळा जवळ आला की, मुंबईतील नालेसफाईच्या कामावरून पालिकेकडून भरभक्कम दावे केले जातात. अशाच ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याच्या दाव्यावर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला ठोकून काढले. ही टीका केल्यावर पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना ती टीका झोंबली. त्यातून हे शाब्दिक युद्ध सुरू झाले. यशवंत जाधव यांनी ट्विट करून दिलेल्या उत्तरावर भातखळकरांनी त्यांना खरमरीत भाषेत प्रत्युत्तर दिले. ‘रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्यांना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्यांना. पालिका समर्थच आहे. पण सत्ताधारी निकम्मे आहेत. जनतेसाठी नालेच काय आम्ही राजकारणातील घाणही साफ करण्याचे काम करत आहोत,’ असे प्रत्युत्तर भातखळकर यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

हमासच्या रॉकेटमुळे भारतीय महिलेचा इस्राएलमध्ये मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने परिचारिका ‘दीन’

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

“फॅमिली डॉक्टर”साठी आकड्यांचा आरसा

पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून सध्या नाल्यांच्या सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे दावे करण्यात येत असले तरी छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम मात्र ८ टक्केही पूर्ण झालेले नाही, असे ट्विट आमदार भातखळकर यांनी केले होते. एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीत छोट्या नाल्यांच्या सफाईचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले होते. त्यावर यशवंत जाधव यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले. जाधव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, तुम्ही अजिबात चिंता करू नका. सर्व कामे पूर्ण होतील. पालिका समर्थ आहे. त्यावर भातखळकरांनी ट्विट करून रोखठोकन उत्तर दिले.

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नालेसफाईची कामे पालिकेकडून केली जातात. पण ती कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून केला गेला तरी दर पावसाळ्यात नाले तुंबतातच आणि मुंबईतील काही भागात कायम पाणी जमा होते. त्यामुळे यावेळीही पालिकेकडून केलेला नालेसफाईचा दावा किती खरा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Exit mobile version