शिवसेनेने मंदिरासाठी दिलेले १ कोटी परत घेऊन टिपूची मजार बांधावी

शिवसेनेने मंदिरासाठी दिलेले १ कोटी परत घेऊन टिपूची मजार बांधावी

अयोध्येतील राम मंदिराच्या परिसरातील जागेच्या खरेदीविक्रीवरून निष्कारण आकांडतांडव सुरू असताना शिवसेनेने आपल्या श्रद्धेला या घटनेमुळे ठेच लागल्याचा कांगावा केला. त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भातखळकर यांनी म्हटले आहे की, लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत. त्याचा व्यवस्थित हिशेबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी रुपये परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही.

रामजन्मभूमी ट्रस्टवर जमिनी जास्त किमतीला खरेदी केल्याच्या आरोपावरून गदारोळ सुरू असून ट्रस्टने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे.

हे ही वाचा:
मूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल

महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, फेसबुकवरुन मैत्री

लपवलेले मृतांचे आकडे हळूहळू येऊ लागले बाहेर

अबब…वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला मिळणार एवढे कोटी रुपये

त्यात उडी घेत शिवसेनेने त्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या जमिनीच्या वादात उडी घेतली. पण त्याला आमदार भातखळकर यांनी तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले.

गेल्या वर्षी मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या वतीने टिपू सुलतानच्या जयंतीदिनाचे पोस्टर्स झळकले होते. तेव्हा शिवसेनेच्या त्या कृतीवर जोरदार टीका झाली होती. तोच संदर्भ घेत आमदार भातखळकर यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळेस शिवसेनेने विरोध केला होता. तसेच राम मंदिराचा पाया शिवसेनेच रचला असे सांगत स्वतःकडे श्रेय घेण्याचा प्रयत्नही केला. त्यावरून त्यांना टीकेचे धनी व्हायला लागले आहे. आता या निष्कारण तयार केलेल्या जमिनीच्या वादात उडी घेऊन शिवसेनेने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version