आमदार अतुल भातखळकर यांनी उडविली खिल्ली
आम्ही अंडी उबविली होती, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडविली असून अखेर मुख्यमंत्र्यांनी ते घरकोंबडे आहेत, हे मान्य केले आहे, अशी चुरचुरीत टिप्पणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारामतीच्या दौऱ्यावर असताना भाषणात म्हणाले की, राजकारणात इनक्युबेशन सेंटर हवं असतं. त्याला उबवणी केंद्र म्हणतात. पण आम्ही नको ती अंडी उबवली. पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. यावर भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
आम्हीही अंडी उबविली होती – मुख्यमंत्री
…अखेर मान्य केले की ते घरकोंबडे आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून गेल्या दीड-दोन वर्षांत मुख्यमंत्री निवासस्थानातून किंवा मातोश्रीतूनच काम करणे पसंत केलेले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सातत्याने टीकाही झालेली आहे. महाराष्ट्रात या दीड-दोन वर्षांत अनेक संकटे कोसळली. अनेक चक्रीवादळे, महापूर, कोरोनाचे संकट असतानाही मुख्यमंत्र्यांनी अगदी मोजक्यावेळा महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र ते आषाढी एकादशीला स्वतः कार चालवत गेले होते. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली.
आम्हीही अंडी
उबवली होती- मुख्यमंत्री…. अखेर मान्य केले
की ते घरकोंबडे आहेत— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
एका भाषणात त्यांनी आपण घरातून उत्तम काम करू शकतो, तर मंत्रालयात जाण्याची गरजच काय, असे विधान करत घरातून काम करण्याचे समर्थनही केले होते.