मदतीची याचना करणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांची अरेरावी

मदतीची याचना करणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांची अरेरावी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. गेले काही दिवस कोकण पट्ट्यात झालेल्या पावसाच्या महाभयंकर प्रलयानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे परिस्थितीचा आढावा घेत दौरा करत आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्याचा पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे कोकणातल्या पिचलेल्या जनतेवर आरेरावी करताना दिसले. त्यांच्या वर्तनातून मग्रुरी आणि बेफिकीरी दिसत होती.

बुधवार रात्रीपासून कोकणाला बसलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या या हाहाकारात कोकणात अनेक ठिकाणी १०-१५ फूट पाणी साचले होते. या साऱ्या परिस्थिती अनेक कोकणवासीयांचे संसार उध्वस्त झाले. या साऱ्या परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे कळल्यावर स्वाभाविकपणे आपल्या व्यथा मांडण्यासाठी नागरिक पुढे सरसावताना दिसले.

हे ही वाचा:

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

काय केंद्र केंद्र म्हणताय? राज्याचा बजेट चार साडेचार लाखांचा आहे

आमदार खासदारांचा पगार इथे वळवा, पण आम्हाला मदत करा!

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात भास्कर जाधव हे त्यांच्या सोबत सावलीसारखे वावरताना दिसले. पण मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये शिवसेना आमदार भास्कर जाधव हे सारी नीतिमत्ता बाजूला ठेवून नागरिकांवर अरेरावी करून उद्धटपणे बोलताना दिसले. मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडणाऱ्या एका महिलेने “आमचे संसार वाचवा…आमदार-खासदार यांचे दोन महिन्याचे पगार कोकणला द्या” असे म्हणत टाहो फोडला. हे ऐकताच भास्कर जाधव त्या महिलेला उद्देशून उडवा उडवीच्या स्वरात बोलू लागले. “आमदार खासदार पाच महिन्यांचा पगार देतील पण त्यातून तुमचे काही होणार नाही” असे म्हणत जाधव ह्यांनी त्या महिलेला तेथून घेऊन जाण्यास सांगितले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या एका महिलेवर भास्कर जाधव हे हात उगारताना दिसून आले. भास्कर जाधव यांच्या या वर्तनावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी भास्कर जाधवांचे हे व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर टीकास्त्र डागताना दिसत आहेत.

Exit mobile version