देवेंद्र फडणवीस यांनी दिला सल्ला
अलिकडे भास्कर जाधव यांचे वर्तन आश्चर्यकारक आहे. प्रत्येक विषयात सगळे नियम त्यांनाच माहीत आहेत, असे ते दाखवतात. आम्हीही अनेक वर्षे विधिमंडळात आहोत. आम्हाला काहीच माहीत नाही, असे त्यांचे वर्तन आहे. मी त्यांना सल्ला देतो की, त्यांनी सुधारावं, अशा शब्दांत विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना सल्ला दिला.
मुंबईतील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भास्कर जाधव यांनी केलेल्या नकला, त्यानंतरही त्यांची सुरू असलेली अरेरावी, नंतर माफीनामा यामुळे विधिमंडळातील वातावरण चांगलेच तापले.
फडणवीस म्हणाले की, या सभागृहाचा दुरुपयोग केला गेला. भास्करराव जाधव यांचे वर्तन आक्षेपार्ह आणि लज्जास्पद होते. जे पंतप्रधान बोललेच नाहीत ते त्यांच्या तोंडी टाकले. अशा प्रकारचा एकही व्हीडिओ कुणी देऊ शकलेले नाही. यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अंगविक्षेप करून नक्कल करण्याचा प्रयत्न भास्कर जाधव यांनी केला ते आक्षेपार्ह आहे. नंतर दबावाखाली त्यांनी माफी मागितली. सभागृहापेक्षा कुणीही स्वतःला मोठं समजू नये. या वर्तनाचा निषेध करतो ते सहन केले जाणार नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता जो प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले, असेही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
उमेदवाराच्या कुटुंबात बारा सदस्य; पण त्याला मत मात्र एकच!
नवा स्मार्टफोन घेतला आणि ढोल वाजले!
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
पंतप्रधान मोदींचा अपमान केल्या प्रकरणी भास्कर जाधवांचा बिनशर्त माफीनामा
आज वीजेच्या संबधातील लक्ष्यवेधी आम्ही मांडली. सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांचं याला समर्थन होतं. विशेषतः शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू आहे. वीज बिल भरले नाही तर डीपी काढून नेले जातात. गावाचे कनेक्शन्स बंद आहेत. गावंच्या गावं अंधारात बुडाली आहेत. हा विषय लावून धरला त्यावर मंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही म्हणून कापावे लागते असे उत्तर देतात. म्हणून राज्य सरकारने उत्तर द्यावे लक्ष्यवेधी राखून ठेवली आहे. वित्तमंत्री उत्तर देतील असे सांगण्यात आले आहे.
ओबीसी आयोगासाठी ४३० कोटींची तरतूद केल्यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, पैसे आधीच दिले असते आठ महिन्यांपूर्वी तर आरक्षण वाचवू शकतो. पण न्यायालयाने स्थगिती आणल्यावर आता वरातीमागून घोडे अशी स्थिती आहे.