आमदार भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावरून खळबळ
चिपळूणच्या दौऱ्यात पूरग्रस्तांशी केलेल्या अरेरावीमुळे आमदार भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला हात जोडून त्या लोकांच्या विनंतीवर ‘मदत करतो’ असे आश्वासन देत असताना भास्कर जाधव यांना ते पसंत पडले नसावे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना तेथील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी गराडा घातला आणि आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हात जोडून मदतीचे आश्वासन दिले. त्यावेळी जाधव यांनी धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगितले की, तुम्ही हात जोडू नका. त्यावरून आता भास्कर जाधव टीकेचे लक्ष्य बनले आहेत.
आधीच भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात एका महिलेवर हात उगारल्याचे दिसले. त्यावरून सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य केले गेले. त्याचवेळी चिपळुणात एका महिलेने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून आमदार-खासदारांचा दोन महिन्याचा पगार कोकणाकडे वळवा अशी आर्त मागणी केली तेव्हाही तिला समजावण्याचा इशारा त्यांनी त्या महिलेच्या मुलाला दिला. एकूणच त्यांचे वर्तन हे आक्रमक होते. महाराष्ट्रात त्यांच्या या वर्तनावर टीका झाली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचा ‘पालखी सोहळा’ पूरग्रस्तांच्या दारी
भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांना करणार सढळ हस्ते ही मदत
न्यूज डंका, कारुळकर प्रतिष्ठानची पूरग्रस्तांना साथ; आपलाही हवा मदतीचा हात
मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर हात जोडू नये, अशी विनंती करताना सर्वसामान्य पूरग्रस्तांना तेवढी किंमत देण्याची गरज नाही, असे भास्कर जाधव यांना सुचवायचे आहे का, असा सवाल विचारला गेला.
रविवारी झालेल्या या घटनेनंतर दिवसभर भास्कर जाधव यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार झाला.
Newsdanka.com यांतील बातम्या आणी वार्ता बघण्यांत आणी वाचण्यांत समाधान मिळते.कारण सुवाच्य लिपी स्पष्टता त्यामुळे आवडतात.