पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेश दौऱ्यात भाषण करताना ते बांग्लादेशच्या मुक्तीसाठी सत्याग्रह केल्याचे सांगितले. काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली हे सांगत त्यांच्या कार्याची फळे खाण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नेते मोदींच्या या विधानांनंतर खूपच आक्रमक झालेले दिसले. काँग्रेसचे नेते मोदींवर टीका करू लागले. पण वस्तुतः बांग्लादेशच्या स्वातंत्र्याची पहिली मागणी ही भारतीय जनसंघानेच केली होती आणि त्यासाठी सत्याग्रहही केला होता. या विषयीचे ऐतिहासिक दाखले देत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेत्यांची शाळा घेतली. काँग्रेसच्या सर्व आरोपांची भातखळकर यांनी पुरी हवाच काढून टाकली.
बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रही म्हणून मी सुद्धा भूमिका बजावली होती असा दावा मोदींनी यावेळी केला. पण विरोधकांनी यावरून मोदींवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. पण अशा विरोधकांना आमदार अतुल भातखळकर यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. भातखळकर यांनी आधी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
कोविड-१९ विरुद्धच्या आणखी एका लसीच्या चाचणीला सुरूवात
” ‘संघर्षमा गुजरात’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित पुस्तक १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले.
पण फक्त वाफाळ आणि वाचाळ बडबडीशी ज्यांचा संबंध आहे त्यांना हे पुस्तक कुठून माहीत असंणार? या पुस्तकात बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामात मोदी तिहार जेलमध्ये गेल्याचा उल्लेख आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
'संघर्षमा गुजरात' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित पुस्तक 1978 मध्ये प्रसिद्ध झाले.
पण फक्त वाफाळ आणि वाचाळ बडबडीशी ज्यांचा संबंध आहे त्यांना हे पुस्तक कुठून माहीत असंणार? या पुस्तकात बांगला देश स्वातंत्र्य संग्रामात मोदी तिहार जेलमध्ये गेल्याचा उल्लेख आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 27, 2021
त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ऐतिहासिक दाखले आणि पुरावे देत बांग्लादेश स्वातंत्र्यासाठी आणि स्वतंत्र बांग्लादेशला मान्यता देण्याची पहिली अधिकृत मागणी भारतीय जनसंघाने केली होती. त्यासाठी जनसंघाने कशा प्रकारे आंदोलन केले होते या इतिहासाची सविस्तर मांडणी आमदार अतुल भातखळकर यांनी व्हिडिओद्वारे केली आहे. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या मुक्तिवाहिनीला पाठिंबा द्यावा अशी जाहीर भूमिका भारतीय जनसंघाने घेतली होती. या संदर्भात भारतीय जनसंघाने एक ठराव पारित केला होता. लोकसभेत जनसंघाच्या खासदारांनी यासंबंधीची मागणी केली होती. जी मागणी इंदिराजींनी धुडकावली. अटलजींच्या नेतृत्वात दिल्लीत जनसंघाने केली होती असे भातखळकर यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
ऐका आमदार अतुल भातखळकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी
भारतीय जनसंघ भारत की आत्मा है एकता और अखंडता की मिसाल हमेशा कायम की है जनसंघ ने भाजपा विधायक अतुल जी एक अनुभवी और कुशल लीडर हैं उन्होंने बहुत ही सटीक वर्णन किया है
My name is Satyam Kumar