राज्य सरकारचे पालघर आदिवासी बहुल जिल्ह्याकडे लक्ष नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली. भारती पवार या सध्या जन आशिर्वाद यात्रा करत आहेत. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष याबद्दल मत व्यक्त केले. पालघरच्या आदिवासी बहुल भागातील आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना पोहचल्या पाहिजेत. आदिवासी समाजाला मुलभूत सुविधा व आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास घडविण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याची भूमिका आज भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेतून मांडण्यात आली.
केंद्रीय नेतृत्वाखाली आज पालघरमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडली. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने डॉ. भारती पवार यांच्यावर आदिवासी तसेच समाजातील उपेक्षित घटकांची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी व वंचित समाजाला ताकद देण्यासाठी तसेच या समाजाला विकासाकडे नेण्यासाठी डॉ. भारती पवार व भाजपा नक्कीच कटीबध्द आहेत, असा विश्वास यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान पीएम केअर्स फंडामधून रुग्णालयाला कोरोनाच्या काळात १५ व्हेंटिलेटर्स पाठविण्यात आले होते. परंतु त्यामधील एकही व्हेंटिलेटर्स सध्या या रुग्णालायात कार्यान्वित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या रुग्णालयात आयसीयू विभागही सुरु नसल्याबद्दल त्यांनी रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरर्संना याचा जाब विचारला. नजिकच्या काळात येथील रुग्णालयासाठी सर्वतोपरी वैदयकीय मदत देण्याचे आश्वासनही डॉ.पवार यांनी दिले.
हे ही वाचा:
पुण्यात उभारले गेले पंतप्रधान मोदींचे मंदिर
अंबरनाथच्या एमआयडीसीत चोरट्यांचा सुळसुळाट
भाजपा नेत्याची ‘इथे’ करण्यात आली हत्या
पाकिस्तानात रणजितसिंहाच्या पुतळ्याची नासधूस
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरवात पालघर जिल्ह्यातील वाघोबा मंदिर, देवखोप येथून झाली. केंद्रीय मंत्री डॉ.पवार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी आमदार मनिषाताई चौधरी, माजी आमदार अशोक उईके, भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.