भाजपाचे नेते म्हणतात आम्ही ‘मोदी का परिवार’

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर प्रोफाईल बायो बदलला

भाजपाचे नेते म्हणतात आम्ही ‘मोदी का परिवार’

लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकीय वर्तुळात हालचाली वाढत आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर प्रोफाईल बायो बदलला आहे. एक्स प्रोफाईलवर भाजपाच्या नेत्यांनी आपला बायो बदलला आहे. भाजपाच्या सर्व बड्या आणि वरिष्ठ नेत्यांनी आपल्या बायोमध्ये ‘मोदी का परिवार’ असं लिहिलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपला एक्सवरील बायो बदलला आहे.

‘इंडी’ आघाडीतील राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौटुंबिक मुद्द्यावरून टीका केली होती. यादव यांनी टीका करताना म्हटले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही त्याला आम्ही काय करु शकतो. पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत. कारण, त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांनी केशवपण केलं नव्हतं.” पाटन्यातील गांथी मैदानातील एका सभेत त्यांनी ही टिप्पणी केली होती.

लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेनंतर पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनात भाजपा नेत्यांनी आपला बायोमध्ये बदल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी एका रॅलीमध्ये ‘मैं हू मोदी का परिवार’ चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी ‘एक्स’वरील बायो बदलली आहे.

हे ही वाचा:

बेपत्ता खलाशाच्या वडिलांचे पंतप्रधान मोदींना साकडे!

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!

अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, डॉक्टर विरेंद्र कुमार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, संबित पात्रा, सुधांशु त्रिवेदी, पियुष गोयल, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, मनोज तिवारी अशा बड्या नेत्यांनी त्यांच्या एक्सवरील नावासमोर ‘मोदी का परिवार’ असं लिहिलं आहे.

Exit mobile version