‘महापौर, वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थन करत आहात का?’

‘महापौर, वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थन करत आहात का?’

मुंबईतील मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान याचे नाव देण्यावरून सध्या राज्यात राजकारण तापले असून भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थ करत आहात का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

भालचंद्र शिरसाट यांनी कालपर्यंत मालाडच्या उद्यानाला राणी लक्ष्मीबाई नाव देण्यासाठी मागणी करणार्‍या महापौरांची आज कोलांटी उडी! असा टोला त्यांनी महापौरांना लगावला आहे. वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थ करत आहात का? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. सभावृत्तांतात खाडाखोड करून लबाडी करताय? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच अमित साटम यांचे अनुमोदन पत्र दाखवा असे जाहीर आव्हान त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

आता ग्रुप एडमिन ठरणार ‘राजा’

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

मालाडमधील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून बुधवारी मुंबईत भाजपाने तीव्र आंदोलन केले होते. त्यावेळी पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यासाठी एका नगरसेवकाने अनुमोदन दिले होते आणि तसा प्रस्तावही दिला होता, असा आरोप केला. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित साटम यांचे नाव घेत त्यांनीच रस्त्याला नाव देण्यासाठी प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले. मात्र, आमदार साटम यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. कोणतेही अनुमोदन दिलेले नाही किंवा मी असा कोणताही प्रस्ताव नगरसेवक असताना दिलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Exit mobile version