मुंबई महानगर पालिकेतून विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महापालिकेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची संधी अधिक आहे. त्यांचे ८३ नगरसेवक असून भाजपाचा उमेदवार महानगरपालिकेतून विधानपरिषदेत जाऊ शकतो. त्यामुळे विधान परिषदेतील भाजपाच्या आमदारांची संख्या वाढणार आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे हे अतिशय अवघड आहे. त्यामुळेच आता भाई जगताप यांचे भविष्य पणाला लागलेले आहे. म्हणजेच जगतापांचे विधान परिषद सदस्यत्व चांगलेच धोक्यात आलेले आहे.
दुसरीकडे या पदासाठी शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु शिवसेनेमध्ये सध्या त्यांच्या नावाला फार वजन नाही.त्यामुळे आता नेमकी या जागेवर कुणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रामदास कदम शिवसेनेचे भाई तर दुसरे भाई जगताप या दोन्ही नावांना पसंती मिळाली नाही. तर पालिकेतून भाईगिरी हद्दपार होईल असेच म्हणावे लागेल. सद्यस्थिती पाहता या गोष्टींचा फायदा भाजपला होऊ शकतो. भाजपकडे ८३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. त्यांचा विजय हमखास असून त्यामुळे विधानपरीषदेतील संख्याबळही वाढणार आहे.
पालिकेतून शिवसेनेकडून रामदास कदम तसेच काँग्रेसचे भाई जगताप हे दोघे निवडून गेले आहेत. असे असले तरी नगरसेवकांच्या सदस्य संख्येवरुन सदस्यांची निवड होते. त्यामुळेच ७७ नगरसेवकांनी पहिल्या पसंतीचे मत दिल्यावर सदस्याचा थेट विजय होतो.
हे ही वाचा:
लसींसाठी सरकार खर्च करणार आणखी १४ हजार कोटी; किती मिळणार लशी?
अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा
टाळेबंदीला कंटाळून व्यावसायिकाने केला आत्मघात
ठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे
सध्याच्या घडीला पालिकेत काँग्रेसचे संख्याबळ २९ आहे. त्यामुळे कितीही आटापिटा केला तरी काँग्रेसला स्वत:चा सदस्य निवडून आणणे अवघड आहे. त्यामुळेच आता भाई जगतापांची विधीमंडळातील खुर्ची धोक्यात आली आहे. काँग्रेसला आपला सदस्य निवडून आणायचा असल्याने ४८ नगरसेवक फोडावे लागणार आहेत. हे अशक्य असल्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणे अवघड आहे. मुख्य म्हणजे भाई जगताप तसेच रामदास कदम सलग दोन वेळा मुंबई महानगर पालिकेतून निवडून गेले आहेत. त्यामुळे आता दुसरे कोण याठिकाणी वर्णी लावणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.