28 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
घरराजकारणभाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष

भाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष

आगामी निवडणुका लक्षात घेता दलित मतांचे ध्रुवीकरण करण्याचा काँग्रेसचा इरादा

Google News Follow

Related

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची गच्छंती करून त्याजागी वर्षा गायकवाड यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिक्षण मंत्री हे पद गायकवाड यांच्याकडे होते. आता ही नवी जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. काँग्रेसचे सीनियर नेता एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांच्या खांद्यावर मुंबई काँग्रेसचे हे शिवधनुष्य सोपविण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल काँग्रेसने केले आहेत.

हे ही वाचा:

रामायण फेम दीपिका चिखलियांची ‘आदिपुरुष’मधील कृती सॅननवर टीका

धमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना

इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप

चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!

महिलेकडे हे पद सोपविण्यामागे एक उद्देश असू शकतो शिवाय, दलित मतांचा विचार करूनही गायकवाड यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली असू शकते, असा दावा केला जात आहे. मागासवर्गियांचा मोठा टक्का मुंबईत आहे. तो लक्षात घेता वर्षा गायकवाड यांच्यासारखा चेहरा काँग्रेसला तारून नेऊ शकेल, अशी अपेक्षा असावी. प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोलेदेखील मागासवर्गीय असल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र अशा दोन्ही आघाड्यांवर दलितांच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली युती हेदेखील यामागील कारण असू शकते, असे म्हटले जात आहे. दक्षिण मध्य मुंबईतून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवू इच्छितात. पण काँग्रेस इथला आपला दावा सोडू इच्छित नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा