मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी समर्थकांसह आंदोलनाच्या दरम्यानच पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्कीही केली. नुकतेच त्यांनी मुंबईत हे आंदोलन केले. पण हे आंदोलन करत असतानाच भाई जगताप यांचा स्वतःवरील ताबा सुटला. पोलिसांशीच भाई जगताप यांनी वाद घालून समोरील हवालदाराला धक्का दिला आणि त्यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली. कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाईंची पोलिसांसोबत झालेली बाचाबाची आता सर्वांच्याच चर्चेचा विषय झालेली आहे. पोलिसांना कोरोना लॉकडाऊन निर्बंधांमुळे आंदोलनाला अटकाव केला पण भाई जगताप पोलिसांचे ऐकायला तयार नव्हते.
पोलिसांनी भाई जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु भाई जगताप पोलिसांशी हुज्जत घालू लागले. एका पोलिसाला त्यांनी मागेही ढकलले. विशेष म्हणजे यावेळी भाई जगताप यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेले सहकारी सुद्धा यावेळी आक्रमक झालेले दिसले. यावेळी प्रकरण चिघळणार याची जाणीव जगताप यांना झाल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना मागे होण्याचे आवाहन केले. अखेर भाई जगताप यांच्या आवाहनानंतर ते मागे सरले, असे या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
हे ही वाचा:
वडेट्टीवारांनी पुन्हा केले मुख्यमंत्र्यांचे काम हलके
१० वर्ष ठाण्याचे वारकरी भवन वापराविना
…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई
वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांना धमकी; पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली मदत
सध्या भाईंसह त्यांच्या ४० कार्यकर्त्यांनी कोविडच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली होती त्यावेळी निषेध कार्यक्रमातही भाईंनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. मे महिन्यात झालेल्या या कार्यक्रमस्थळी पोलिस आल्यामुळे भाई त्यांच्यावर तुम्ही आमच्या कार्यक्रमात काय करताय, अशी विचारणा केली होती.
काही दिवसांपूर्वी अगदी त्यांनी फिल्मी स्टाईल सायकल चालवूनही आंदोलन केले होते. त्यावेळी ही आंदोलने आहेत की इव्हेन्ट अशी टीकाही झाली होती.