मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विषयी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. जगताप यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ही चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाई जगताप यांनी गेला काही काळ समाज माध्यमांवर चुप्पी साधलेली होती तर नंतर अकाउंट हॅक झाल्याची सारवासारव त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप हे समाज माध्यमांवर चांगलेच सक्रीय असतात. कधी ते विरोधकांवर निशाणा साधताना दिसतात तर कधी वैय्यक्तीक प्रचार-प्रसार करताना दिसतात. सोमवार ८ ऑगस्ट रोजी त्यांनी अशाच प्रकारची एक पोस्ट त्यांच्या फेसबूक पेजवर केली. जगताप हे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी फेसबूकवर टाकले. पण त्यासोबतच एक अश्लील फोटोही त्यात होता. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्यालोकांना हा फोटो पाहून धक्काच बसला. नेटकऱ्यांनी लगेच या पोस्टचे स्क्रिनशाॅट काढले. काहींनी भाई जगताप यांना कमेंटमध्ये त्या ‘अश्लील’ फोटोबद्दल सांगितले. आपली ही ‘घोडचूक’ लक्षात आल्यावर भाई जगताप यांनी लगेचच ती पोस्ट आणि फोटो डीलिट केले.
हे ही वाचा:
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले
पण स्क्रिनशाॅटच्या या जमान्यात सोशल मीडियावर गेलेली गोष्ट डीलिट करूनही व्हायची ती चर्चा झालीच. थोड्या वेळापूर्वी भाई जगताप यांनी पुन्हा सकाळच्या कार्यक्रमाचे फोटो आणि पोस्ट टाकली आहे. पण त्यावरही लोकांनी ‘त्या’ विशिष्ट फोटोची आठवण काढत भाई जगताप यांना चांगलेच ट्रोल केले आहे. या सर्व प्रकारा बाबत भाई जगताप यांनी नेहमीचे ठरलेले अकाउंट हॅक झाल्याचे कारण दिले आहे. पण तरिही या विषयाची चर्चा काही थांबता थांबत नाहीये.