भाई जगतापांचा काँग्रेसच्याच नितीन राऊत यांना झटका

भाई जगतापांचा काँग्रेसच्याच नितीन राऊत यांना झटका

महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नाही, याची प्रचीती वारंवार येत असते. आता कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी आपल्याच काँग्रेस पक्षाचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना लक्ष्य करत प्रशासन मंत्र्यांचे ऐकत नाही, असा आरोप केला.

मागण्या पूर्ण होत नसतील आज निदर्शने करत आहोत, उद्या उपोषण करू आणि मंत्र्यांचा राजीनामाही आम्ही मागू, असे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापारेषण कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाई जगताप यांचे बीकेसीतील कार्यालयासमोर आंदोलन झाले. त्यावेळी त्यांनी राऊत यांचे म्हणणे प्रशासनातील अधिकारीच ऐकत नाहीत, असा आरोप केला.

जगताप म्हणाले की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णयही प्रशासनातील अधिकारी मानत नाहीत. मंत्रिमहोदयांचे आदेश पाळले जात नसतील आणि प्रशासन इतके उद्दाम असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी हे आंदोलन त्यांना इशारा आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा आमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू.

हे ही वाचा:

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी

अरेरे! अखेर विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल का गेले ईडी कार्यालयात?

यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित कामाच्या फाइल पुढे सरकत नाहीत, असा आरोप केला होता. माजी आमदार व काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा राजीनामा मागितला होता. आता भाई जगताप यांनी काँग्रेसचेच मंत्री डॉ. नितीन राऊत यांना लक्ष्य करत घरचा अहेर दिला.

Exit mobile version