आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी आज पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. खटकड़कलां मध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आम आदमी पक्षाच्या एकूण २५ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मान हे पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते १७ वे नेते ठरले आहेत.
पंजाबचे राज्यपाल बी. एल. पुरोहित यांनी मान यांना शपथ दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री या नात्याने पद आणि गोपनीयतेची ही शपथ घेतली आहे. ईश्वराला साक्षी मानून भगवंत मान यांनी ही शपथ ग्रहण केली आहे. तर शपथ घेतल्यानंतर त्यांनी इन्कलाब जिंदाबादचे नारे दिले आहेत. मान यांनी पंजाबी भाषेतून शपथ घेतली आहे.
हे ही वाचा:
मुंबई पोलिसांनी पारदर्शक भूमिका घेतली असती तर…
आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी
‘काश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून पुण्यातील हॉटेलमध्ये जेवले १९०० ग्राहक
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
भगवंत मान यांच्या शपथविधी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “भगवंत मान जी यांचे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. पंजाबच्या विकासासाठी आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करू.” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच आम आदमी पक्षाकडून हे जाहीर करण्यात आले होते की राज्यात जर आम आदमी पक्ष निवडून आला तर भगवंत मान हे राज्याचे मुख्यमंत्री असतील. त्याप्रमाणे पंजाबमध्ये आम आदमी पक्ष काँग्रेसची सत्ता उलथवून सत्तेत आल्यानंतर आता मान हे मुख्यमंत्री पदी विरजमान झाले आहेत.