हुतात्मा भगत सिंग यांच्या नातवाचे भाजपाला मतदान करण्याचे आवाहन

हुतात्मा भगत सिंग यांच्या नातवाचे भाजपाला मतदान करण्याचे आवाहन

थोर स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांच्या नातवाने भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनामुळे ऐन पंजाब निवडणुकीच्या तोंडावर भाजपासाठी अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंजाब निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शनिवार, १९ फेब्रुवारी रोजी भगतसिंग यांचे नातू यदविंदर सिंग संधू यांचा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

भाजपा उमेदवार राणा गुरमित सिंग सोधी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राणा गुरमीत सिंग सोधी हे फिरोजपुर मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. सोधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर भगतसिंग यांचे नातू यदविंदर सिंग संधू यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे भाजपाला मतदानात फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा:

कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट

मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे

“मी असे मानतो की फिरोजपुर हे हुतात्मा भगतसिंग यांचे कुटुंब आहे आणि फिरोजपुरला भगतसिंग यांचा वारसा आहे. राणा गुरमित सिंग सोधी यांना फिरोजपूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवार घोषित केल्याचे समजले तेव्हा मी त्यांच्या समर्थनात उतरलो आहे आणि सर्वांना आवाहन करत आहे की त्यांनी सौदी यांना पाठिंबा द्यावा” असे संधू यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पंजाबमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. पंजाबमध्ये सर्व जागांसाठीची मतदानाची प्रक्रिया आज पार पडणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, अकाली दल आणि भाजपा-पंजाब लोक काँग्रेस आघाडी असे पक्ष निवडणुकीत आपले नशीब अजमावताना दिसत आहेत.

Exit mobile version