‘मला त्यावेळी विमानातून उतरवले होते आता, नियतीने त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरूनच खाली उतरवले आहे’ असे
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतेच विधान केले आहे ,यावर उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एका मुलाखतीत उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्यातील राजकारण , पहाटेचा शपथविधी याविषयी भरभरून बोलत होते.
आपल्या खास शैलीत बोलताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी वरील विधान केले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मसुरी येथे जाण्यासाठी आएएस अकादमीत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते, पण प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना सरकारी विमानाने जायचे होते पण ,राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने त्यांना त्यावेळेस विमानांतून खाली उतरवण्यात आले होते. यावर विरोधी पक्ष नेते देंवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस तीव्र निषेध व्यक्त केला होता.
भगत सिंह कोश्यारी काय म्हणाले ?
उद्धव ठाकरे हे संतमाणूस आहेत ते कुठे राजकारणात आले. त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थित चालवायला हवी होती. मुख्यमंत्रीपदी बसण्याची त्यांची पात्रता नव्हती, पण त्यांना ते पद देण्यात आले. त्यांच्याकडे शरद पवार सारखा उत्तम मार्गदर्शक असूनही उद्धव ठाकरेंना कोणीही वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवले म्हणूनच नियतीने त्यांना खुर्चीवरून खाली उतरवले अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांना बळीचा बकरा करण्यात आला आहे. मी देवाला प्रार्थना करतो, त्यांनी या सगळ्यांपासून लांब राहावे. त्यांना बळेबळेच मुख्यमंत्री केले गेले होते. पण मला विमानातून खाली उतरावल्यामुळे मी त्यांना सत्तेतून खाली खेचले नाही पण नियतीने करायचे तेच केले असेही महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले.