महाराष्ट्रात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती काळ मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन आणावा लागेल अशी धमकीही दिली. यावर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची टीका केली आहे. “अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत.” असे देशपांडे म्हणाले.
“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021
“फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का?” असेही संदीप देशपांडेंनी विचारले.
हे ही वाचा:
“ग्रामपंचायत निवडणुका, शिवसेना-काँग्रेसची आंदोलनं झाली, तेव्हा कोरोना नव्हता का? लोकांना फक्त फसवलं जात आहे” असंही संदीप देशपांडे म्हणाले.