30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणशिवसेनेकडून 'बेस्ट'ला खड्ड्यात घालण्याचा पराक्रम

शिवसेनेकडून ‘बेस्ट’ला खड्ड्यात घालण्याचा पराक्रम

Google News Follow

Related

बेस्ट उपक्रमाने २०२२-२३ या वर्षाचा २ हजार २३६ कोटी ४८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प अंदाज बेस्ट समितीत सादर केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत उपक्रमाच्या तोट्यात आणखीन वाढ झाली आहे. बेस्टची वाटचाल दिवसेंदिवस नुकसानीच्या खाईत चालली असून यापूर्वी बेस्टच्या वाहतूक विभागाला सोळाशे कोटींच्या आर्थिक खड्ड्यात घालूनही डोके ठिकाणावर न आलेल्या सत्ताधारी शिवसेना पक्षाने स्थापनेपासून नफ्यात असलेल्या विद्युत पुरवठा विभागालासुद्धा रुपये ३३२ कोटींच्या नुकसानीत ढकलण्याचे काम केले आहे.

बेस्टसाठी शिवसेनेकडे कुठलेही नियोजनबद्ध धोरण नसल्यामुळे यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पात बेस्टचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडून गेले असून उपक्रमाला खड्ड्यात घालण्याचा पराक्रम सत्ताधारी शिवसेनेने केला असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाडेतत्त्वावरील बस म्हणजे ‘पांढरा हत्ती’

बेस्टने खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसेस हा तर भविष्यात पांढरा हत्ती ठरणार आहे. त्यापासून अपेक्षित उत्पन्न ४७० कोटी दर्शवले असले तरी खर्च ९७० कोटी होणार आहे तर उपक्रमाची संचित तूट २ हजार ११० कोटींवर पोचली आहे. केंद्र शासनाच्या अनुदानातून बेस्ट उपक्रमात एकूण ३४० ई बसेस आल्या असून पुढील आर्थिक वर्षात मोदी सरकारच्या फेम २ योजनेअंतर्गत १ हजार ९०० इलेक्ट्रिक बस गाड्यांचा बेस्टच्या ताफ्यात समावेश होणार आहे. त्याकरिता सुमारे रु. १ हजार कोटींचे अनुदान केंद्र शासन देणार आहे अशी माहिती बेस्ट समिती सदस्य गणाचार्य यांनी दिली.

विद्युत पुरवठा विभागाचीही दयनीय अवस्था

सत्ताधारी शिवसेनेने विद्युत पुरवठा विभागाची ही दयनीय अवस्था करून ठेवली आहे. आता त्यातून बाहेर पडण्यासाठी अपारंपारिक ऊर्जा खरेदी, नवीन इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर, केबल्स, विद्युत उपकेंद्र दुरुस्ती, मीटर रीडिंग करिता अद्यावत सामग्री यासाठी कोट्यवधींचे अनुदान भारत सरकारने बेस्टला देऊ केले आहे असे असतानाही उपक्रम तोट्यात जातो हे अनाकलनीय आहे अशी टीका बेस्ट समिती सदस्य श्री. गणाचार्य यांनी केली आहे.

हे ही वाचा:

अंबरनाथ एमआयडीसीत वायूगळती; श्वसनाच्या त्रासामुळे ३० जण रुग्णालयात

कोण आहेत मोदींचे नवे सल्लागार अमित खरे?

‘महाविकास आघाडी सरकारने महाविद्यालये सुरू करण्यावरून केला खेळखंडोबा’

विरोधकांच्या ‘निवडक’ मानवाधिकारावर मोदींची टीका

 

भाजपा बेस्टच्या प्रगतीसाठी ‘कटिबद्ध’

मुंबईकरांची विश्वसनीय सेवा असलेली बेस्ट सुस्थितीत ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून बेस्टमधील कामगारांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता त्यांच्या थकबाकी वेतनाचे, ग्रॅज्युइटीचे प्रदान व अन्य प्रशासकीय मनमानी विरोधात कामगारांना सुरक्षितता व हमी देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा