बेस्ट सीएमची सुमार कामगिरी

बेस्ट सीएमची सुमार कामगिरी

शतकातून एकदाच येणाऱ्या महामारीच्या सुरूवातीच्या काळात बेस्ट सीएम म्हणवून घेतल्यानंतर महा‘विकास’आघाडी सरकारची ही महामारी हाताळण्यातील कमतरता उघड झाली आहे. एकूणच कोविड हाताळणीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात तळात राहिला आहे.

आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१च्या पहाणीनुसार कोविड-१९चे ‘अंदाजित रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील तफावत’ तसेच ‘अंदाजित मृत्यु आणि प्रत्यक्ष मृत्यु यातील तफावत’ या दोन्ही पातळ्यांवर राज्य सरकारची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली आहे. त्यामुळे कोविड हाताळणीतील या सरकारचा नाकर्तेपणा जाहिर झाला आहे.

आर्थिक सर्वेक्षणात बाधित रुग्णांच्या अपेक्षित संख्येत आणि प्रत्यक्ष बाधितांच्या आकडेवारीत उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, तेलंगणा आणि दिल्ली या राज्यांच्या कामगिरी अव्वल दर्जाची राहिली आहे. महाराष्ट्राच्या बाबत जवळपास -९५६ इतकी भयंकर तफावत आढळली. म्हणजे अंदाजीत रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या साधारणपणे ९५६ ने जास्त होती. याच क्रमवारीत उत्तम कामगिरीसह योगी आदित्यनाथांचे उत्तर प्रदेश सरकार अव्वल स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात ही तफावत जवळपास १,११४ इतकी आहे. याचा अर्थ अंदाजीत रुग्णांपेक्षा प्रत्यक्ष बाधितांची संख्या साधारणपणे १,११४ ने कमी राहिली आहे.

यानंतर प्रत्यक्ष मृत्यु आणि अंदाजित मृत्यु या आकडेवारीतही महाराष्ट्राची कामगिरी देशात अत्यंत सुमार राहिली आहे. या आकडेवारीत केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा दबदबा राहिला आहे. अंदाजित मृत्यु आणि प्रत्यक्ष मृत्यु यांतील फरक केरळमध्ये केवळ ३८ इतका राहिला आहे तर महाराष्ट्रातील हा फरक जवळपास ३०९ राहिला आहे.

या आकडेवारीमुळे कोविड हाताळणीतील महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीचे वस्त्रहरण झाले आहे.

Exit mobile version