विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?

नवी तारीख लवकरच घोषित होणार

विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?

जुलै महिन्यात १३- १४ जुलैला होणारी विरोधी पक्षांची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बेंगळुरू येथे ही बैठक होणार होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचे नेते के सी त्यागी यांनी हे स्पष्ट केले. बिहार आणि कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन याच दरम्यान असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनांनंतरच ही बैठक होईल. त्याची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

बिहारचे अधिवेशन १० ते २४ जुलै या काळात आहे त्यामुळे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना ही बैठक नंतर घेण्याची विनंती केली. या निर्णयामुळे विरोधी पक्षात सारे काही आलबेल नाही यांची चर्चा सुरू झाली आहे. कारण हा निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे हेच बैठक पुढे ढकलण्याचे कारण असेल असे मानले जात आहे. त्यातच काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वितुष्ट आहे. केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या विरोधात काँग्रेसचा पाठींबा मागितला आहे पण तो काँग्रेसने दिलेला नाही.

हे ही वाचा:

‘कोणतीही अनियमितता नाही; पालिकेच्या मुदतठेवी वाढत आहेत’

पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडाला?

इसिसशी संपर्क असल्याच्या संशयावरून एनआयएची मुंबई, पुण्यात छापेमारी

भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

काँग्रेस जर पाठींबा देत नसेल तर आपण पाटणा येथील बैठकीला येणार नाही अशी धमकी केजरीवाल यांनी दिली होती. पण काँग्रेस नेते अजय माकन यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती की, ते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यावर टीका करतात आणि पुन्हा पाठींबाही मागतात.

Exit mobile version