बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का

बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का

बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जोरदार धक्का बसणार असल्याचे भाकीत द इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडिया एग्झिट पोलने वर्तवले आहे. प. बंगालमध्ये भाजप २६ ते ३१ जागा मिळवेल, असा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला अवघ्या ११ ते १४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

एग्झिट पोलनुसार, भाजपच्या मतटक्क्यांतही वाढ होत आहे. प. बंगालमधील ४२ लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यांत निवडणुका झाल्या. प. बंगालमध्ये इंडिया गटात फूट झाल्यामुळे येथे तिरंगी लढत बघायला मिळाली. यात तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी रिंगणात उतरले होते. अर्थात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्तरावर इंडिया गटाला पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा:

एका तासात १८०० भाविकांना मिळणार केदारनाथाचे दर्शन

तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजारीवाल हनुमानाच्या चरणी

पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

सन २०१९च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ४२ पैकी २२ जागांवर विजय मिळवला होता. तर, भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. प. बंगालमध्ये ४० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. सीव्होटर एग्झिट पोलनुसार, भाजपला यंदा २३ ते २७ जागा मिळतील. तर, ममता यांना केवळ १३ ते १७ जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसला अवघ्या एक ते तीन जागा मिळतील. द न्यूज १८ मेगा एग्झिट पोलनुसार, भाजपला २१ ते २४ जागा आणि तृणमूल काँग्रेसला १८ ते २१ जागा मिळतील.

Exit mobile version