बेगम ममता बंगालला मिनी पाकिस्तान बनवेल

बेगम ममता बंगालला मिनी पाकिस्तान बनवेल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणावर निशाणा साधत, भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना ‘बेगम’ म्हणून संबोधले आहे. ममता ‘बेगम’ बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ बनवेल असेही त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जींच्या मुस्लिम मतांवर अवलंबून राहण्यावर टीका करत असताना सुवेंदू अधिकारी असे म्हणाले.

“भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल.”  असा आत्मविश्वास भाजपाचे नेते आणि ममता बॅनर्जींना थेट आव्हान देणारे सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांच्या विधानसभेपैकी तीस जागांसाठी मतदान झाले. याच तीस जागांविषयी सुवेंदू अधिकारींनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसले आहे. पश्चिम बंगालमध्ये ७९.७९% इतके मतदान पाहायला मिळाले. या वेळच्या पश्चिम बंगालच्या निवडणूका पहिल्यापासूनच भारतभर चर्चेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला आहे. भाजपाच्या आक्रमक प्रचारापुढे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बावचळलेल्या दिसत आहेत.

हे ही वाचा:

भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल

गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे

मोदी आज पुदुचेरीत सभा घेणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांवर अवलंबून असल्याचे दिसत आहे. ममतांना या निवडणुकीत अब्बास सिद्दीकी यांच्या आयएसएफ म्हणजेच इंडियन सेक्युलर फ्रंटने मुस्लिम मतं स्वतःकडे ओढवण्याची धोका संभवतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात बंगालमधील एकूण मुस्लिम मतांपैकी सत्तर टक्के मुस्लिम मतं ममतांना मिळाल्याचे स्पष्ट झाले होते.

Exit mobile version