उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. फोटोच्या खाली मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेत एक अर्थपूर्ण कॅप्शन लिहिले आहे. कॅप्शनमध्ये मुख्यमंत्र्यानी विजयाबद्दल लिहिले आहे. १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होत आहे. पहिला टप्पा गुरुवारपासून सुरू होत आहे.
आज ४ वाजता च्या सुमारास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या ट्विटवर खात्यावर पंतप्रधानांसोबत त्यांनी एक फोटो टाकला आहे. या फोटोत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हातात हात घेत हात उंचावून विजयी झाल्याचा तो आनंद दिसत आहे. यामुळे युपीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यानी विजय होण्याचे सूचित केले आहे.
पीड़ित, शोषित, दुःखित बान्धवों के हमको हैं कष्ट मिटाने,
डटे हुए हैं राष्ट्रधर्म पर सीना ताने…कदम निरंतर चलते जिनके,
श्रम जिनका अविराम है।विजय सुनिश्चित होती उनकी,
घोषित यह परिणाम है॥ pic.twitter.com/GoOEjnfiwZ— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 9, 2022
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथील ५८ जागांवर उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान पक्षही बूथवर रवाना झाले आहेत.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी.डी. राम तिवारी यांनी सांगितले होते की, उत्तर प्रदेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहेत. आणि आज सायंकाळपासून प्रचाराचे कामकाज बंद करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. बुधवारी मतदान पक्ष मतदान केंद्राकडे रवाना होतील, असे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
यूपी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का…
ठाकरे सरकार विरोधात अण्णा हजारेंचे बेमुदत उपोषण
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी ५८ जागा, दुसऱ्या टप्प्यासाठी १४ फेब्रुवारीला ५५ जागा, २० फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यासाठी ५९ जागा, २३ फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यासाठी ५९ जागा, पाचव्या टप्प्यासाठी २७ फेब्रुवारीला ६१ जागा आणि सहाव्या टप्प्यासाठी ३ मार्चला ५७ जागांसाठी तसेच ७ मार्चला सातव्या टप्प्यासाठी ५४ जागांसाठी मतदान होणार आहे.