समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

“मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं.” असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपाला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी हे सडेतोड उत्तर दिले आहे.

ही आघाडी सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडतात. प्रत्येकजण सुभेदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशाप्रकारची अवस्था या आघाडीची पहायला मिळतेय, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

दरम्यान, मलाही माध्यमातूनंच कळलं की ईडीने अनिल देशमुखांविरोधात अशाप्रकारची लूकआऊट नोटीस काढली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोर जाणं अधिक योग्य होईल. तसाच निर्णय त्यांनी करायला हवा, असा सल्लाही फडणवीसांनी दिला.

हे ही वाचा:

जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा

पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा

तालिबान-हक्कानी अफगाणिस्तान सत्तेचा वाद पेटला

… तर माझ्या डोक्यात दोन गोळ्या झाडा

करुणा शर्मा प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हीडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Exit mobile version