29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणपहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले

पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले

एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी ती घटना स्पष्टच सांगितली

Google News Follow

Related

२०१९ला महाविकास आघाडी सरकार होण्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगत भाजपापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासह जी पहाटे शपथ घेतली त्यासंदर्भात फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते ऐकून शरद पवारांनी मात्र त्राग्याने प्रतिक्रिया दिली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी आपली चर्चा झाली होती आणि त्यांची या सरकारसाठी सहमती होती.

२०१९मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. पण हे सरकार दोन दिवसही टिकले नाही.

एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, माझ्यासह दोनवेळा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढविली. त्यावेळी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. पण तेव्हा उद्धव ठाकरे यांची त्याला सहमती होती. मात्र जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊनही आवश्यक संख्या तयार होते आहे आणि आपला मुख्यमंत्री होतो आहे, तेव्हा त्यांनी माझे फोन उचलणेही बंद केले. माझ्याशी त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या ते इतके मोहात पडले होते की, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ते सत्तेत गेले. हा एक माझ्यासोबत झालेला विश्वासघात होता.

हे ही वाचा:

लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

WPL : भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधनाला सर्वाधिक मानधन

‘प्रेमाच्या प्रतिक’ला अच्छे दिन!

सरकार पडण्याची कसलीही भीती वाटत नाही

दुसरा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना मी कमी दोषी मानतो. कारण ते निवडणुकीत आमच्यासोबत नव्हते. जेव्हा उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेची बोलणी करत होते तेव्हा आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली. आम्हाला एक स्थिर सरकार हवे अशी ती ऑफर होती त्यासाठी आपण एकत्र येऊन सरकार करू शकतो. राजकारणात एखादी व्यक्ती धोका देते तेव्हा आपण त्याच्याकडे आशेने पाहात बसत नाही. आम्ही म्हटले ठीक आहे. बघुया प्रयत्न करून. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या. पण चर्चा होऊनही त्यांनी कशी पलटी मारली हे आपण पाहिले आहे. त्यामुळे दुसऱ्यावेळीही विश्वासघात झाला पण पहिल्या विश्वासघाताच्या तुलनेत तो छोटा होता. पहिला विश्वासघात हा आमच्याच व्यक्तीने केला होता.

अर्थात, तुम्ही या शपथविधीला पहाटेचा म्हणा किंवा उत्तररात्रीचा म्हणा पण झाला तो भूतकाळ आहे. त्यांनी आमच्याशी जे वर्तन केले त्यामुळेच आम्हाला संधी मिळाली. त्यांच्या पक्षात खळबळ उडाली आणि काही लोक पक्षाच्या बाहेर पडले.

शरद पवार म्हणाले…

यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, मी देवेंद्र फडणवीस यांना सुसंस्कृत समजत होतो पण असत्याचा आधार घेऊन ते अशी वक्तव्ये करतील असे वाटले नव्हते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा