आक्रमक विरोधकांमुळे संजय राठोडचा राजीनामा मंजूर

आक्रमक विरोधकांमुळे संजय राठोडचा राजीनामा मंजूर

वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केला आहे आणि आता राज्यपालांकडे देखील तो पाठवण्यात आला आहे. विरोधी पक्षाने सातत्याने हा विषय उचलून धरला होता.

हे ही वाचा:

‘चौथ्या सामन्यातही इंग्लंडचा गरबा’

पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधातील सबळ पुरावे पुढे येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात संजय राठोड याचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सातत्याने विरोधी पक्षाकडून केली जात होती. त्यामुळे संजय राठोडने २८ फेब्रुवारी रोजी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मात्र त्याला मंजूरी देण्यात आली नव्हती. आज मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी करून राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे संजय राठोड याची गच्छंती आता निश्चित आहे.

दिनांक १ मार्चपासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. विविध कारणांमुळे हे अधिवेशन वादळी होत आहे. पूजा चव्हाण हिची कथित आत्महत्या, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणी पोलिसांकडून, डॉक्टरांकडून स्त्रियांवर झालेले अत्याचार अशा विविध विषयांवरून विरोध पक्षाने सत्ताधारी पक्षाला घेरायला सुरूवात केली आहे. विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मुद्यांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Exit mobile version