आरोग्य आणीबाणीसाठी सुसज्ज राहायला हवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी- २० परिषदेत आवाहन

आरोग्य आणीबाणीसाठी सुसज्ज राहायला हवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर येथे आयोजित जी- २०च्या परिषदेत आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी आपल्याला तयार रहायला हवे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारतातील २.१ मिलिअन डॉक्टर्स, ३.५ मिलियन नर्सेस, १.३ मिलियन पॅरामेडिक्स, १.६ मिलियन फार्मासिस्ट तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लाखो लोकांच्यावतीने पंतप्रधान मोदींनी जी- २० परिषदेतील आरोग्य मंत्र्यांचे स्वागत केले.

संपूर्ण जगाने गेल्या वर्षभरापूर्वी कोविडचा भीषण काळ पाहिला. यामध्ये जगभरातील करोडो लोक बाधित झाले होते तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी आपल्याला तयार रहायला हवे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आरोग्य हे आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी असायला हवं. काळाने आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य शिकवले आहे. यामध्ये प्रामुख्याने औषधांचा आणि लशींचा पुरवठा किंवा आपल्या लोकांना देशात सुखरुप घेऊन येणं हे शिकवलं आहे.

करोना महामारीच्या काळाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्यामुळे ग्लोबल हेल्थ सिस्टिमने लवचिक असणे गरजेचं असणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळं भविष्यातील आरोग्य आणीबाणीला प्रिव्हेंट, प्रिपेअर आणि रिस्पॉन्डसाठी तयार असलं पाहिजे, असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

हे ही वाचा:

दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन

द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी

फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये

भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण

महात्मा गांधींनी आरोग्य हा देशासाठी महत्वाचा विषय असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी ‘की टू हेल्थ’ नावाचे पुस्तकही लिहिले होते. त्यांनी म्हटले होते की, निरोगी असणे म्हणजे मन, शरीर सुसंवाद आणि समतोल स्थितीत असणे होय, म्हणजे आरोग्य हा जीवनाचा पाया आहे. सन २०३० पर्यंत टीबीचे भारतातून निर्मुलन करण्याचे लक्ष्य असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

Exit mobile version