‘बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, शरद पवार नगर म्हणून ओळखणार’

‘बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, शरद पवार नगर म्हणून ओळखणार’

काल विधानसभेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक नवी घोषणा केली आहे. शंभर वर्ष जुनी असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींची नावे बदलण्याची घोषणा आव्हाड यांनी केली आहे. वरळीतील बीडीडी चाळीचे बाळासाहेब ठाकरे नगर, नायगाव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीचे नाव बदलून राजीव गांधी नगर असे करण्यात आले आहे. तर गोरेगावमधील पुनर्विकसित पत्राचाळ यापुढे सिद्धार्थनगर म्हणून ओळखली जाईल, असेही जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे.

मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती शंभर वर्षाहून जुन्या आहेत. याच बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरु झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन महिन्यात कामाठीपुरा येथे विकास प्रकल्प सुरु होणार असल्याचीही घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

पुढे आव्हाड म्हणाले, ” निवारा देणे हे म्हाडाचे काम आहे आणि त्याचबरोबर म्हाडा सामाजिक जाणिवेतूनही काम करत आहे. जून २०२२ पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना ६०० फुटांचे घर देणार आहे. तसेच मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.ताडदेव येथे महिलांसाठी इमारत बांधली जात आहे. या इमारतीला ३२ कोटी खर्च आला असून या इमारतीत ९२८ महिला राहू शकतील. तर पालघर येथे २० एकर जागा मिळाल्यास तेथे चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा प्रयत्न करू.”

हे ही वाचा:

“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा  

बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व

पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड 

सरनाईकांचे २ फ्लॅट आणि भूखंड जप्त

त्याशिवाय वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलजवळच्या भूखंडावर जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. आणि जोगेश्वरी पश्चिम येथे म्हाडाच्या भूखंडावर मुंबईकरांसाठी एक जागतिक दर्जाचे हॉस्पिटल बांधण्यात देखील बांधण्यात येणार आहे.

Exit mobile version