भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. याआधी या पदावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे होते. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, आशिष शेलार यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. काही दिवसांपूर्वीच शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी शिवसेनेचे नऊ आमदार आणि भाजपाचे नऊ आमदार असे एकूण १८ आमदारांची निवड मंत्रिमंडळात करण्यात आली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
…म्हणून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर होणार बंद
‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी
धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे बावनकुळे यांनी आभार मानले आहेत. ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवला, मला एवढी मोठी जबाबदारी दिली त्यासाठी सर्वांचे आभार. भाजपा पक्षला अजून मजबूत करण्यासाठी मी काम करेन. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.