महाविकास आघाडीमधील जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये पुढच्या काळात खिंडार पडणार आहे. २०२४मध्ये अशी परिस्थिती होईल की लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यापुरताही उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रात होणार आहे असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सध्या शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. आता भाजपमध्ये देखील काही नेते प्रवेश घेण्याची चर्चा रंगली आहे. त्यावर बांकुले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख आणि काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या संदर्भात बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अनेक नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. काही प्राथमिक पातळीवर सुरु आहे . काही पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. काहींची वेळ ठरायची आहे. काहींची ठरायची आहे. रोज दिसेलच की कुठले कुठले कुठले प्रवेश होत आहेत. पुढच्या काळात प्रवेशाचे असे असे बॉम्बस्फोट होणार आहेत की महाराष्ट्रातील जनतेला देखील आश्चर्य वाटेल. पण पण मोठे मोठे धक्के बसणार आहेत असा गौप्यस्फोट देखील बावनकुळे यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा लोकांवर कोणताही प्रभाव नाही. महाराष्ट्रात तर भारत जोडो यात्रेदरम्यान हजारो काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये काही भविष्य नाही, अशी जाणीव आता अनेकांना होत आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
हे ही वाचा:
आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार
शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे त्याबद्द्दल बोलतांना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद जात की राहत हे निवडणूक आयोग ठरवेल. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे स्वत:च शिवसेना संपवणार आहेत. त्यासाठी इतरांची गरजच नाही. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व प्रभावहीन आहे असा टोला लगावला.