बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

अखेर कर्नाटकचे राजकीय नाट्य संपले असून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला विराम लागला आहे. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कर्नाटकच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत बसवराज बोम्मई यांना विधिमंडळ नेता म्हणून निवडले गेले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यापासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना उधाण आले होते. पण मंगळवार, २७ जुलै रोजी या चर्चांना वर पडदा पडला. मंगळवारी संध्याकाळी सात वाजता भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मावळते मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी बोम्मई यांना विधिमंडळ पक्षनेता बनवण्यासाठी प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. त्यामुळेच आता बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवार २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.

हे ही वाचा:

… त्या लग्नासाठी उठला लॉकडाऊन?

भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी

मदत घेऊन निघाले भाजप युवा मोर्चाचे ट्रक…

वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?

बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. बोम्मई यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जनता दल या पक्षापासून झाली. नंतर २००८ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पहिल्यांदा ते सरकारचे जलसंधारण मंत्री म्हणून कामकाज पाहत होते. तर आत्ताही येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्री म्हणून कामकाज पाहिले. ते कर्नाटकातील लिंगायत समाजाचे एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे वडील एस.आर बोम्मई हे देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

Exit mobile version