बार्बाडोसने व्यक्त केले भारताचे आभार

बार्बाडोसने व्यक्त केले भारताचे आभार

जगात सध्या कोविड-१९ महामाहीचे संकट घोंगावत असताना भारताची कोविशिल्ड लस त्यावर प्रभावशाली ठरली आहे. भारताने आपली लस वेगवेगळ्या देशांना निर्यात केली आहे. त्या आधारे अनेक देशांचे लसीकरणाचे कार्यक्रम सुरू होऊ शकले आहेत.

नेपाळ, भूतान, मालदीव, ब्राझिल इत्यादी देशांसोबतच बार्बाडोस या देशालाही भारताची लस प्राप्त झाली आहे. बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली  यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी त्यांनी भारताच्या कृतीला अतिशय औदार्यपूर्ण असे संबोधले आहे. बार्बाडोसला एक लाख डोस मिळण्याची शक्यता आहे.

बार्बाडोस या देशाची लोकसंख्या २ लाख ८७ हजारच्या आसपास आहे. या देशात कोविड-१९ चे १ हजार ६४१ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १ हजार २७४ रुग्ण बरे झाले आहेत.

मोटली यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या देशातील आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्ड या लसीच्या वापराला परवानगी दिली आहे. यानंतर उत्पादकांच्या सुचनेप्रमाणे या लशीच्या वापराला सुरूवात होईल.

भारताकडून पहिल्या ५० हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यात १ लाख डोसचा समावेश होतो. हे डोस पहिल्यांदा पोलिस, सुरक्षा रक्षक, आघाडीचे कार्यकर्ते, आरोग्य सुविधेतील कर्मचारी, हॉटेल कर्मचारी इत्यांदींना देण्यात येतील.

Exit mobile version