बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत

काँग्रेसवर साधला निशाणा

बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह आणखी काही नेते अडचणीत आलेले असताना भाजपाने काँग्रेसला या मुद्द्यावरून सर्वच स्तरावरून घेरले आहे. भाजपा नेत्यांनी काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून आता भाजपा खासदार बांसुरी स्वराज यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी बॅगेवर एक संदेश लिहित काँग्रेसला चपराक लगावली आहे. त्यांच्या या बॅगेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ उपक्रमावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाजपा खासदार बांसुरी स्वराज या संसद भवनात पोहोचल्या. यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्या बॅगेवर खिळल्या होत्या. बांसुरी स्वराज यांनी आणलेल्या बॅगेवर ठळक अक्षरात “नॅशनल हेराल्डची लूट” असे लिहिलेले दिसून आले. या संदेशामधून नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजपने काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा लगावला.

बॅगेवरील संदेशाबद्दल बांसुरी स्वराज म्हणाल्या की, लोकशाहीतील चौथा स्थंभ असलेल्या माध्यमांमध्येही भ्रष्टाचार करण्यात आला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काँग्रेस पक्षाची जुनी कार्यशैली आणि विचारसरणी अधोरेखित झाली आहे. सेवेच्या नावाखाली ते सार्वजनिक संस्थांना त्यांची वैयक्तिक मालमत्ता वाढवण्याचे साधन बनवतात. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेतृत्व यासाठी जबाबदार आहे. त्यांनी याचे उत्तर न्यायालयात द्यायला हवे,” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे.

‘एक राष्ट्र- एक निवडणूक’ या विषयावर संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) एक महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठक काळात अनेक प्रसिद्ध कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. ही बैठक एकूण चार सत्रांमध्ये होईल. बैठकीच्या पहिल्या सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गुप्ता यांच्याशी चर्चा होईल. तर, दुसरे सत्र जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस.एन. झा यांच्यासोबत असेल. तिसऱ्या सत्राला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डॉ. न्यायमूर्ती बी. एस. चौहान उपस्थित राहतील. शेवटचे सत्र राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत असेल.

हे ही वाचा..

सोन्याची ‘लक्ष’वेधक भरारी!

सपा-काँग्रेस ‘महिला-विरोधी मानसिकतेचे’

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी पाहिला जयपूरचा आमेर किल्ला

नव्या पोप निवडीच्या कॉन्क्लेव्हमध्ये ‘हे’ चार भारतीय कार्डिनल्स सहभागी होणार; कशी असते प्रक्रिया?

बांसुरी स्वराज यांची बॅग आता चर्चेत आल्यानंतर यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियंका गांधी यांची बॅगही चर्चेत आली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, प्रियंका गांधी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा लिहिलेली बॅग घेऊन संसदेच्या परिसरात पोहोचल्या होत्या.

दाऊदचा गँगस्टर, छोटा राजनचा मदतगार, निजाम कोकणीला वसईत ठोकला..| Dinesh Kanji | Mahesh Desai | Part 1

Exit mobile version