दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच भाजपाकडून आपच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात आले आहे. तिसऱ्यांदा सत्तेत येऊ पाहणाऱ्या आप पक्षाला भाजपाकडून लक्ष्य केले जात आहे. भाजपाच्या दिल्ली युनिटने दिल्लीतील विद्यमान आम आदमी पार्टी सरकारच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.
आपच्या १० वर्षांच्या सत्तेला लक्ष्य करणारे पोस्टर भाजपाने कार्यालयाबाहेर लावले आहेत. पोस्टर्समध्ये, भाजपने आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना ‘भ्रष्टाचार के तीस मार खान’ म्हटले आहे. भाजपने त्यांच्या पोस्टरमध्ये केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्यातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याचा आरोप केला आहे. दारू कंत्राटदारांचे मार्जिन पाच टक्क्यांवरून १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. तसेच शिक्षणमंत्री असताना दारू घोटाळ्यात तुरुंगात गेल्याचे सांगत भाजपने मनीष सिसोदिया यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्योगपतींच्या छुप्या बैठका घेऊन मद्य धोरण राबविल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
"Bhrashtaachaar Ke Tees Maar Khaan": BJP lash out at AAP with posters outside party office
Read @ANI Story | https://t.co/JDCpdaVVhw#BJP #AAP #DelhiAssemblyElections2025 pic.twitter.com/AlawQUUEuo
— ANI Digital (@ani_digital) December 31, 2024
पुढे भाजपने सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भ्रष्टाचार आणि हवाला चॅनलद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. भाजपने आपच्या दिल्ली मॉडेलचीही निंदा केली आहे. देशातील इतर कोणत्याही राज्य सरकारच्या तुलनेत आपचे जातस मंत्री तुरुंगात आहेत. याशिवाय भाजपने आपवर टँकर माफिया असल्याचा आरोपही केला असून, दिल्लीतील पाणीपुरवठा भारतात सर्वात महाग आहे, असं म्हटलं आहे. भाजपने गाझीपूरमधील लँडफिलचाही उल्लेख केला आणि दावा केला की ते देशातील सर्वात मोठे लँडफिल बनले आहे.
हे ही वाचा :
येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!
… म्हणून प्रियांका वाड्रा यांनी गृहमंत्री शाहांचे मानले आभार
गाझियाबादमध्ये चमत्कार! वीज पडलेल्या शेतातील खड्ड्यात सापडले ‘शिवलिंग’
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत राजकारण तापले आहे. भाजप, आप आणि काँग्रेस हे सर्व एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. २०१५ मध्ये ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवल्यानंतर, आपने २०२० मध्ये पुन्हा ६२ जागा जिंकल्या आणि सत्ता स्थापन केली. आता तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी आप उत्सुक असून भाजपाही राजधानी दिल्लीत सत्तेत येऊ पाहत आहे.