“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी उभा असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. संजय राठोड यांच्या गटातील काही लोक आपल्या स्वार्थापोटी त्यांचे समर्थन करत आहेत. मात्र, बंजारा समाजाला ही गोष्ट रुचलेली नाही.” असे भाजपचे नेते गिरीश व्यास म्हणाले.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गिरीश व्यास यांनी बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी नसल्याचे सांगितले. “संजय राठोड यांच्यावर ज्या प्रकराचे आरोप झाले आहेत, तसे आरोप कोणीही उठसूट करत नाही. कोणताही समाज अशा व्यक्तींच्या पाठिशी उभा राहूच शकत नाही. केवळ काही स्वार्थी लोकांच्या माध्यमातून संपूर्ण बंजारा समाज राठोड यांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.” असे गिरीश व्यास म्हणाले.
हे ही वाचा:
“संजय राठोड हे निर्दोष असतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. आपल्या चारित्र्यावर कोणी अशाप्रकारे बोट ठेवले तर राजीनामा देणे, ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. राजकारणात नैतिकता ही जिवंत राहायला पाहिजे. संजय राठोड यांना न्यायव्यवस्था आणि कायद्यावर विश्वास असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे. असेही गिरीश व्यास यांनी सांगितले.