बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली होती. त्यानुसार आता बंडातात्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळीच सातारा पोलिस बंडातात्या कराडकर यांच्या साताऱ्यातील पिंजर मठात पोहचले होते. वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी होणार आहे.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्री धोरणाविरोधात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यानंतर बंडातात्या यांनी माफी मागितली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा:
पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे
धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार?
तसेच राज्य सरकारच्या वाईन विक्री धोरणाला विरोध करण्यासाठी बंडातात्या यांनी आंदोलन केले होते. मात्र, हे परवानगी नसताना केल्याचे समोर आले त्यामुळेसुद्धा बंडातात्या अडचणीत आले आहेत. त्यासाठीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. राज्यात काही ठिकाणी बंडातात्या यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.