“द एम्पायर नावाची वेबसिरीज हॉटस्टारवर येत आहे. जे अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी आहे, या वेबसिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी! आणि दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुगलबादशाह बद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे!” अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे.
“मुघलांची राक्षसी प्रतिमा दाखवणारे चित्रपट पाहणं ‘प्रॉब्लेमॅटिक आणि त्रासदायक’ वाटतं. कारण ते ‘ऐतिहासिक पुराव्यांवर’ आधारित नाहीत” असं मत कबीर खान यांनी व्यक्त केलं होतं. तसंच, अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणाऱ्या ‘द एम्पायर’ या वेब सिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी, अशी मागणीही राम कदम यांनी उचलून धरली आहे.
#TheEmpire नावाच्या वेबसिरीज #hotstar वर येत आहे. जे अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी आहे, या वेबसिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी!
आणि दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुगलबादशाह बद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे! – राम कदम pic.twitter.com/gtR9f8cn1C
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 27, 2021
ज्या मुघल बादशाहांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. रक्तपात करत लूटमार केली, लोकांवर अनन्वित अत्याचार करत छळ केले. मंदिरं तोडली, धर्मशाळांचा विद्ध्वंस केला, त्या मुघलांचा जयजयकार आणि प्रशंसा या वेब सीरीजमध्ये केली आहे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत जे मुघल बादशाह भारतात येऊन लूट करतात, त्यांचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं? आमचा या वेब सीरीजला विरोध आहे. याच्यावर कायमची बंदी घालायला हवी, अशी मागणी राम कदमांनी ट्विटरवरुन केली आहे.
हे ही वाचा:
…नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल
आयएसआयएस-खुरासानने स्वीकारली काबुल बॉम्ब हल्ल्याची जवाबदारी
दुसरीकडे, दिग्दर्शक कबीर खान म्हणतात की या आक्रमणकारी मुघल बादशाहांचा भारताच्या निर्मितीत, देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी भारतात लूट केली, त्यांचा भारताच्या निर्मितीत वाटा? हे विधान न पटणारं आहे. कोणाला चित्रपट-मालिका बनवायची असेल, तर आमच्या शिवरायांवर बनवा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापसिंग यांच्यावर बनवा. पण अशा प्रकारचं विधान आम्हाला मान्य नाही. अत्याचारी मुघल बादशाहाबद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.