रेनिसान्स स्टेटवर महाराष्ट्रात संताप; ठाकरे सरकारची मात्र अळीमिळी गुपचिळी

रेनिसान्स स्टेटवर महाराष्ट्रात संताप; ठाकरे सरकारची मात्र अळीमिळी गुपचिळी

धर्मासाठी प्राणांचे बलीदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ‘रेनिसान्स स्टेट’ या गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकावर अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना ठाकरे सरकारकडून मात्र त्याबाबत कोणतेही भाष्य केले गेलेले नाही. आता भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही जोरदार प्रहार केला आहे. या पुस्तकावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही कायमची बंदी घालण्यात यावी. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार ते पाऊल उचलणार का, असा सवाल उपस्थित करत पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या मराठा आरक्षणाच्या कारणास्तव संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मराठा समजाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला आहे. नांदेडमध्ये पोहोचल्यावर त्यांनी पत्रकार परिषदेत या पुस्तकावर टीका केली. महाराष्ट्र ज्यांच्याबद्दल अपार आदरभाव बाळगतो अशा व्यक्तींचा अपमान कसा सहन केला जाईल, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

‘सामना’त ममतांच्या नथीतून उद्धव ठाकरेंवर तीर?

समाजमाध्यम कंपन्यांचे कायदेशीर संरक्षण रद्दबादल

ग्लोबल टेंडरिंगला ‘मराठी’त प्रतिसाद नाही, ‘हिंदी’त आहे

३८ वर्षांनी कल्याणकर घेणार मोकळा श्वास

या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह असा मजकूर असल्याचा आरोप केला गेला आहे. त्यानंतर अनेक इतिहासकारांनी या मजकुरावर आक्षेप घेत तो उल्लेख बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. त्यातून या पुस्तकावर बंदी आणली गेली पाहिजे असाही नाराजीचा सूर उमटत आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनीही या पुस्तकावर टीका केली असून या पुस्तकाच्या लेखकावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा समाज अशा निंदानालस्तीमुळे नाराज आहे. तो गप्प बसणारा नाही, असेही राणे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराजांच्यासंदर्भातील लिखाणावरून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Exit mobile version