‘रझा अकादमीवर बंदी घाला’

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा राज्यात पसरताच त्याच्या निषेधार्थ काल राज्याच्या विविध भागात मुस्लीम मोर्चे काढले गेले. दरम्यान अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनेमागे रझा आकादमी असून तिच्यावर बंदी घाला असा इशारा त्यांनी ट्विट करत दिला आहे.

‘महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, नियमांचे पालन करत नाहीत आणि सरकार बसून राहते, बघत बसते. सरकारने एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू’, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेच्या अफवेनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ अशा घटना घडत आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. या ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली.

हे ही वाचा:

अनिल परब शरद पवारांच्या भेटीला

आता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार

…तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र LACवर कसे नेणार?

सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर

कालही नितेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान आझाद मैदानावरून बोलताना अनिल परब आणि सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला होता.

Exit mobile version