बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

‘हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा विचार पुढे गेला पोहिजे’

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे बंधू बिंदुमाधव यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. आज, २९ जुलै रोजी निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठींबा जाहीर केला आहे.

निहार हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव यांचे पुत्र आहेत. बिंदुमाधव यांचे ११९५ साली एका अपघातात निधन झालं होत. याआधी निहार हे राजकारणात जास्त सक्रिय नव्हते. यानंतर निहार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून शुभेच्छा द्यायला गेलो. शिंदे साहेब आपलेच नेते आहेत. हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा विचार पुढे गेला पाहिजे, म्हणून मी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे, असे ते म्हणाले. तसेच मी राजकारणात सक्रिय होणार नसून, शिंदे साहेबांच्या पाठीशी, त्यांना पाठिंबा देणार असल्याचं निहार यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

नुकतीच स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. अनेक वर्ष त्या राजकारणापासून दूर होत्या. स्मिता ठाकरे या उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्या राजकारणात सक्रिय होणार का? या चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले असल्याचे स्मिता ठाकरे म्हणाल्या.

Exit mobile version