बाळासाहेबांनीच स्वतःचं नाव देणं नाकारलं असतं

बाळासाहेबांनीच स्वतःचं नाव देणं नाकारलं असतं

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं, असं सांगून नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे नामकरणासाठी लढणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता असून नामकरणाच्या मुद्दयावरून आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं आहे.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वत:चं नाव विमानतळाला देणं नाकारलं असतं. जे. आर. डी. टाटा यांचं नाव विमानतळाला सूचवलं असतं, असं सांगतानाच नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. मात्र, हे सांगतानाच बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी थेट नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सुनावतानाच नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा :

संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये

पुण्यात सोमवारपासून अनलॉक, हे असतील नवे नियम…

केवळ मनाच्या दहा पालख्यांना वारीची परवानगी

पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध नाही. कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलन कसं करावं हे आम्ही काय सांगणार? राजे सुज्ञ आहेत. संभाजीराजे सावध पावलं टाकत आहेत, असं सांगतानाच ते राजे आहेत. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे भक्त आहोत, असं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा आरक्षण मोर्चामुळे ओबीसींनी विचलित होण्याचं कारण नाही. अखेर हा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुटणार आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version